Browse audiobooks by Sudhir Joglekar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Oja Shankar ओजा शंकर
As per the esteemed guidance of revered Golwalkar Guruji, the first teacher to venture into the northeastern part of India was Shankar Dinkar and Bhayyaji Kane. The first batch of propagators, in 1946, went to northeastern India following the instructions of Golwalkar Guruji. After spending approximately 25 years in northeastern India, Ishanya Bharat, they took it upon themselves to tackle the terrorist-infested regions beyond the international border of Manipur. This was the first non-propagator group, a selfless service organization. A journey spanning 51 years from 1971 to 2022. Today, it is not Bhayyaji, but for the remembrance of their students, three schools have been established in Manipur's Ukhrul, Tamenglong, and Churachandpur districts under the aegis of the Former Students Development Foundation. The fascinating story of the 51-year journey of educational transformation in the Meitei, Naga, and Kuki societies. परम पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या निर्देशानुसार शिक्षक म्हणून ईशान्य भारतात गेलेला पहिला शिक्षक म्हणजे शंकर दिनकर तथा भय्याजी काणे. प्रचारकांची पहिली तुकडी १९४६ साली ईशान्य भारतात गेल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी ईशान्य भारतात जाऊन, मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेल्या दहशतवादी भूभागात स्वतःला गाडून घेतलेला हा पहिलाच गैर प्रचारक संघ स्वयंसेवक. १९७१ ते २०२२, तब्बल ५१ वर्षांचा कार्यप्रवास. आज भय्याजी नाहीत, परंतु त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानतर्फे आज मणिपूरच्या उखरूल, तमेंगलाँग आणि चुराचांदपूर या तीन जिल्ह्यात मिशनच्या नाकावर टिच्चून उभी आहेत तीन विद्यालये. मैतेयी, नागा आणि कुकी समाजाच्या शैक्षणिक परिवर्तनाच्या ५१ वर्षांच्या थरारक प्रवासाची ही रोचक कहाणी.
Sudhir Joglekar (Author), Yogesh Ranganekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - VRL Logistics - Eka Anabhishikt Samratachi Vijayi Safar
घरात प्रकाशनाचा तेजीत चालणारा व्यवसाय असताना स्वतःची वेगळी वाट चोखाळत आपला स्वतंत्र व्यवसाय उभा करणा-या विजय संकेश्वर यांच्या व्ही आर एल लॉजिस्टिकची ही कहाणी. वाहतूक व्यवसायातील अग्रगण्य नाव म्हणून व्हिआरएल ओळखले जाते. कर्नाटकात आपलं विशेष स्थान मिळवणारा हा उद्योग कसा उभा राहिला याची ही कहाणी.
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Thomas Cook - Safar Eka Safrichi
थॉमस कुक हा पर्यटन क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे. ज्या काळी पर्यटन व्यवसाय म्हणून माहिती नव्हते तेव्हापासून म्हणजे १८४१ साली थॉमस कुक कंपनीची स्थापन झाली आणि आजही हा ब्रँड अजून टिकून आहे इकेच नव्हे तर तो तितकाच प्रतिष्ठेचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या घडणीची कहाणी..!
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Piri Piri Chiken Nikharyaitakya Jalacha Udyog
मॅकडॉनल्डस, केएफसी किंवा कोणत्याही फूड जॉईंटवर हल्ली क्रेझ दिसते ती पिरी पिरी मसाल्यातल्या पदार्थांची. हा पिरी पिरी मसाला आला कुठून, त्याचा उगम काय हेच सांगणारी ही खमंग कहाणी.
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Mapro Jams Chocolates Aani Faleros
महाबळेश्वर आणि मॅप्रो हे एक अतूट समीकरण आहे. आबालवृद्धांना आवडणारी मॅप्रोची जॅम्स, सिरप, फलेरो चॉकलेट्स याच्या निर्मितीची कथाही तितकीच चवदार आहे. चला, ऐकुया.
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bharatacha Warren Buffett
डी-मार्टसारखी स्वस्तात गृहोपयोगी वस्तू, किराणा पुरवणारी सुपरमार्केट्स आज धो-धो चालत आहेत, पण ही संकल्पना भारतात आणून, यशस्वीरित्या कोणी चालवली माहिती आहे? चला, जाणून घेऊ.
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Adidas Krida Sahitya Nirmiti Udyogacha Aadyapurush
क्रीडाप्रकार कोणताही असो, त्यासाठी विशिष्ट प्रकारचे शूज घालणं हे अलीकडे रुढ झालंय. सकाळचा फेरफटका मारणं असो अथवा मैदानावर जाऊन खेळणं असो, स्पोर्ट्स शूज घालणं हा अलिखित नियम झालाय. त्यामुळेच त्यात भरपूर ब्रॅंड्स आलेले आहेत. आदिदास हा या सगळ्यात आलेला सुरुवातीचा ब्रँड. त्याचीच ही जन्मकथा.
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - MDH - Hatti Mahashyanchya Hatta Katta Brand
एमडीएच मसाले हा ब्रॅंड आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. घरोघरी लोकांच्या 'जिभेवर' असणारं हे ब्रँडनेम इतकं मोठं झालं तरी कसं? त्याचीच ही सुरस कहाणी!
Sudhir Joglekar (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केलेली लहानगी देविता काहीच वर्षात आपल्या मेहनतीच्या जोरावर कंपनीची सीईओ बनली. इतकंच नाही तर टेलिव्हिजन व्यवसायातही तिनं स्वत:चं वेगळ काम निर्माण करून त्यावरही आपली नाममुद्रा उमटवली. देवितासारख्या महत्वाकांक्षी मुलीला हे कसं साध्य झालं?
Sudhir Joglekar (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sabaki Pasand Nirma
दैनंदिन वापराच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्यात नसतात, पण त्या वापरण्याला पर्यायही नसतो. गेल्या काही वर्षात पतंजली या ब्रँडने अस्सल भारतीय बनावटीच्या अशा अनेक वस्तुंचं उत्पादन सुरू केलं आणि रास्त किंमतीत त्याची विक्री केली. त्याचा फार मोठा फटका या कंपन्याना बसला आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्पादनं विकणं किती फायद्याचं ठरू शकतं, हे जवळपास पन्नास वर्षापुर्वी एका द्रष्ट्या उद्योजकानं ओळखलं आणि त्यातून निर्माण झाला 'निरमा'सारखा तगडा ब्रँड. सबकी पसंद बनलेल्या निरमाची ही रंजक आणि प्रेरक कहाणी!
Sudhir Joglekar (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Don Brands Asleli Udyojika
कालबाह्य झालेल्या मातीच्या भांड्यांना आधुनिक डिझाईन्सची जोड देत त्यांचं रुपडं बदलून त्यांना पुन्हा एकदा लौकिक मिळवून देणारा ब्रॅंड म्हणजे 'भूमी'. या ब्रॅंडच्या निर्मात्या आहेत कोकणातल्या धोपावे गावच्या रसिका दळी. 'भूमी'चा विस्तार अगदी परदेशातही होतो आहे. या व्यवसायासोबतच कृपा हेअर टॉनिक आणि आणखी काही उत्पादनं करणारा कुटूंबाकडून आलेला पारंपरिक व्यवसायही रसिका दळी यांनी विस्तारला. या दोन उद्योगव्यवसायांची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या रसिका दळींची ही यशोगाथा!
Sudhir Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer