घनकचरा व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि शहरनियोजनाच्या दृष्टीनंही महत्वाचा मुद्दा. त्या दृष्टीने अनेक प्रयत्न अनेक पातळ्यांवर केले जातात. पण कचरा व्यवस्थापन हा एक व्यवसाय आहे, असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का? हो, हा एक व्यवसाय आहे. तो कसा चालतो, हे ऐकुया.
बोअर चार्जर तंत्रज्ञानाचा व्यवसाय कसा पर्यावरणपूरक आहे, उत्तम अर्थार्जनही मिळवून देणारा आणि म्हणूनच शाश्वत विकासाला कसा हातभार लावणारा आहे, हे सांगणारी ही कहाणी.
ज्येष्ठ नागरिकांसाठी- निवृत्तीनंतर काय करायचं, हा एक मोठा प्रश्न असतो. तसंच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही काही गरजा बदलतात. अनेकांची मुलं देशा-परदेशात विविध ठिकाणी राहतात, सगळीकडेच ज्येष्ठांना सोबत रहायला नेता येतंच असं नाही. अशावेळी ज्येष्ठांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन साकारला गेला - 'अथश्री' हा ज्येष्ठांसाठीच्या घरांचा प्रकल्प. जाणून घेऊया 'अथश्री'बद्दल
2010 मध्ये पुण्यातली जर्मन बेकरी बॉब्मस्फोटानं हादरली. या धक्क्यातून सावरत या हॉटेलनं पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेतली. कशी? ते ऐकुया, यशस्वी उद्योजकच्या या भागात मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.