The founder of the Rashtriya Swayamsevak Sangh and an extraordinary personality driven by the goal of national development was Dr. Keshav Baliram Hedgewar. An account of his entire tenure as an activist is presented in this book. Even in the face of adversity, the organization he founded continues to work with immense enthusiasm both within the country and beyond its borders. The roots of his profound thoughts are reflected in this book. Along with that, the political and social atmosphere of that era is also portrayed realistically. Mr. Palkar has painstakingly compiled and written about the lives of the doctors with great detail, making this book the 'Reference Book' of the organization.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि राष्ट्र उन्नतीच्या ध्येयाने झपाटलेले एक अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. केशव बळिराम हेडगेवार होत. त्यांच्या संपूर्ण कार्यकर्तुत्वाचा आलेख ह्या ग्रंथात मांडण्यात आला आहे. त्यांनी मुहूर्तमेढ रोवलेली संघटना अजूनही तेवढ्याच स्फुर्तीने देशभरात आणि देशाबाहेरही काम करते आहे. त्यामागील खोल विचारांची मुळे आपल्याला या ग्रंथात आढळतात. त्याचबरोबर त्या काळातील राजकीय सामाजिक वातावरणाचेही यथार्थ दर्शन घडते. श्री. पालकर यांनी कष्टपूर्वक सामग्री गोळा करुन लिहिलेले डॉक्टरांचे हे चरित्र म्हणजे संघाचा ‘संदर्भ ग्रंथ’ झाला आहे.
The collection of 72 letters written by the venerable Dr. K. B. Hedgewar, the founder of the Rashtriya Swayamsevak Sangh, was published ten years ago. Today, we present the second edition of these letters to the readers. These letters hold particular significance as they span 15 years of dedicated work for the organization, highlighting their natural importance in the course of the Sangh's activities.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉ. के. ब. हेडगेवार यांच्या निवडक ७२ पत्रांचा संग्रह दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्याची ही दुसरी आवृत्ति आज वाचकांना आम्ही सादर करीत आहोत. हीं सर्व पत्रे संघकार्याच्या ऐन उभारणीच्या १५ वर्षांच्या कालखंडांतील असल्यानें त्यांचं महत्त्व स्वाभाविकच विशेष आहे.