Dr. Chhaya Naik has written the biography of K. M. Kusumatai with utmost dedication and deep emotional connection. The author has benefited from a long association with Kusumatai, and she credits Kusumatai for her profound understanding of her personal experiences and relationships. Biography writing is a meticulous task because the author delves into the lives of individuals whose character they are portraying, exploring their professional field, as well as their family and close ones' memories, the person's writings, speeches, and any relationship or influence they had with the people around them. Dr. Chhaya Naik has accomplished this task with exceptional competence and skill.
डॉ. छाया नाईक ह्यांनी अतिशय समर्पित भावनेने कै. मा. कुसुमताई साठे यांचे चरित्र लिहिले आहे. लेखिकेला कुसुमताईंचा प्रदीर्घ सहवास लाभला आहे आणि त्यांच्या वैयक्तिक जडणघडणीचे श्रेय त्या कुसुमताईंनाच देतात. चरित्रलेखनाचे काम एक प्रकारे चिकाटीचे असते कारण त्या ज्यांचे चरित्र लिहित आहोत त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यासंदर्भातील व्यक्ती तसेच कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या आठवणी, व्यक्तीचे लेखन, व्याख्याने आणि आपला त्या व्यक्तीशी संबंध किंवा प्रभाव ह्या सर्वांचा ताळमेळ साधत ते करावे लागते. डॉ. छाया नाईक ह्यांनी ते अत्यंत समर्थपणे केले आहे.